गृहनिर्माण चळवळीतील युवा नेतृत्व आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल कडणे यांची अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली. दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आलेले उच्चशिक्षित डॉक्टरेट इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते, ईशान्य मुंबई दैवज्ञ ट्रस्टचे सर्वेसर्वा आणि दैवज्ञ चषक समन्वयक समितीचे संस्थापक विशाल कडणे हे विविध माध्यमातून सुप्रसिद्ध उद्योजक आनंद पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्षे दैवज्ञ चषक, दैवज्ञ गरबा, मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, मोफत अन्न धान्य वाटप इत्यादी उपक्रम यशस्वीपणे आयोजन करत आहेत.
अनेक उपक्रमातून समाजश्रेष्ठी स्व. जगन्नाथ भाई पेडणेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे कार्य विशाल कडणे आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करत असतात. हे करत असताना त्यांना सर्वश्री वैभव भुर्के, सुशांत रत्नपारखे, नितीन भुर्के, गौरव पोतदार, प्रथमेश (राज) बेळलेकर, सिद्धेश बेळलेकर, सौरभ नागवेकर, वेदांत मालणकर, समीर वेदक, अभिजित धोत्रे, प्रशांत शेट, विकास मसुरकर इत्यादी समाजबांधवांचे सहकार्य सातत्याने लाभत असते. विशाल कडणे यांनी आपल्या ह्या निवडीबद्दल समाजश्रेष्ठी डॉ गजानन रत्नपारखी, डॉ आनंद पेडणेकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांचे मनःपूर्वक आभार मानले.
युवाप्रमुख पदी नेमणूक झाल्याने वाढलेल्या जाबदारीचे भान लक्षात घेता अजून जोमाने समाजश्रेष्ठी स्व. जगन्नाथ भाई पेडणेकर यांचे विचार पुढे नेत समाजातील सर्व युवा ज्ञाती बंधू भगिनींना मातृसंस्थेच्या छत्राखाली एकत्र आणण्याचा मानस असल्याचे विशाल कडणे यांनी सांगितले.