मुंबई पवई
महापुरुषांचे अपमान हा समाजाचा अपमान भाजप नेते चंद्रकांत पाटील चंपा यांनी महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांनी शाळा उघडण्यासाठी भिक मागुन शाळा उघडल्या असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

त्यांच्याच निषेधार्थ पवईत ११ डिंसे रोजी निषेध आंदोलन व जोडे मारो आंदोलन करण्यात आले.यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.पोलीसांच्या बंदोबस्तात सदर आंदोलन पार पडले.
आंदोलनात २-३ संघटना एकत्रित येत आय.आय.टी मेनगेट येथील बिट ४ चौकी समोर निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनात डी वाय एफ वाय,वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन सेना,पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदी पवईकर देखील यात सहभागी झाले होते.
महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करुन घेणार नाही.आम्ही महापुरुषांचे विचार जनमानसात पोहचवणे व आत्मसात करून त्यांच्या विचारांने पुढे जात आहोत त्यांच्या बद्दल असे वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनात सहभागी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.