पवईतील तरुणांचा उपक्रम
रविराज शिंदे
मुंबई:मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आरोग्याचा प्रश्न ज्वलंत उपस्थीत झाला असताना पालिकेने ही याबाबत जनजागृती साठी कंबर कसली आहे तरी सुद्धा काही चाळ सदृश ठिकाणी नागरिक रस्त्यावरच कचरा फेकून रोगराई ला आमंत्रण देत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पवई तील तरुणांनी अनोखा उपक्रम सुरू केला असून थेट पालिकेला पत्रव्यवहार करून या तरुणांनी कचरा रस्त्यावर फेकल्यास ५०० रूपये दंड आकारण्यात येईल असं आशयाचा फलक पालिकेच्या सहायाने तरुणांनी लावला आहे.
पवई विभागातील माता रमाबाई आंबेडकर नगर लगत, गुलमोहर इमारत समोर नागरिकांकडून पदपथावर कचरा टाकला जातो त्यातच परिसरात रोगराई फोफावत चालली असताना त्यामुळे स्थानिक तरुणांनी एस विभाग महानरपालिका यांना संपर्क साधून सदर ठिकाणी " उघड्या जागेवर कचरा टाकू नका टाकल्यास 500 रुपये दंड भरावा लागणार" असा महानगरपालिकेचा जनजागृती फलक लावण्यात आला आहे.
नागरिकांनी आरोग्याचा विचार करुन सहकार्य करावी व कचरा उघड्या रस्त्यावर नं फेकता कचरा डब्यात टाकावे जेने करून इतरांना याचा त्रास होणार नाही याची काळजी स्वतः नागरिकांनी घ्यावी असे आव्हान स्थानिक तरुण शेखर राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.