पवईत रिपाइं आठवले गटातर्फे भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न

News Dec 27, 2022

तरुण वर्गाला प्रोत्साहन देणारा खेळ आणि तरुणांनी स्वतःहुन आकर्षित होते असा क्रिकेट चा सामाना हिवाळा चालु झाला की ठिकठिकाणी सामन्याचे आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पवई वार्ड १२२ मधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने रविवारी २५ डिसें रोजी भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

पवई मधील हरिश्चंद्र मैदानात ह्या क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पवईतील तसेच आसपासच्या विभागातील एकुण १२-१३ संघांनी सहभाग नोंदविला.

सदर सामन्यात १२ संघापैकी अनवर इलेवन व हरिओम नगर क्रिकेट क्लब यांच्यात अंतिम लढत बघायला मिळाली तर त्यात अनवर इलेवन यांनी सामना जिंकत विजेते ठरले व हरिओम नगर क्रिकेट क्लब यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. या सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं आठवले गटाचे गौतम सोनावणे महाराष्ट्र सरचिटणीस तसेच बाळ गरुड मुंबई उपाध्यक्ष यांची उपस्थिती होती.

आठवले गटातर्फे आयोजित या सामन्यात विजेते संघाला सन्मानचिन्ह व १५००० रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले तसेच द्वितीय विजेते संघाला सन्मानचिन्ह व ११००० रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन भाऊ पंडागळे, विनोद लिपचा व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले होते.सामन्यात सुत्रसंचलन हे अतुल पंडागळे यांनी केले‌.

Tags