by Ravi Raj Shinde
एक जण जखमी

मुंबईः पवई जेवीएलआर गांधी नगर येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी दुपारी ३ वाजता घडली आहे.या घटनेत एक जण जखमी झाला असून मात्र कार आणि ट्रकच मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गांधीनगर मार्गे पवईच्या दिशेने जात असलेल्या MH 08 R 8132 क्रमांकाची स्विफ्ट कारच गांधीनगर येथे चढण चढत असताना अचानक ब्रेक निकामी झाल्याने कार उलट्या दिशेने येत होती दरम्यान त्याच वेगात मागून येणाऱ्या MP 07 GA 5637 क्रमांकाच्या ट्रकच्या पुढील चाकाखाली कार आल्याने ट्रक उलटला व कारचा चक्काचूर झाला. या घटनेत दोन्ही वाहनांचे चालक सुखरूप असले तरी मात्र या घटनेत ट्रकमधील एक जण गंभीर जखमी झाला असून तत्काळ त्याला विक्रोळीच्या आंबेडकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेदरम्यान ट्रक उलटल्याने गांधीनगर वरून पवईच्या दिशेने जाणाऱ्या जेवीएलआर वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल होवून उलटलेल्या ट्रकला बाजूला घेत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. मात्र या गंभीर घटनेत ट्रक आणि कारच मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.


