मुंबई: जम्मूकशमीर च्या श्रीनगर मध्ये कार्यरत असणाऱ्या जवानाचा हृदहयाविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . विजय कोकरे असे या जवानाच नाव असून सातारा जिल्ह्यातील सांडवली तालुक्यातील वासरवाडी गावातील जवान होता. मुंबईतील पवई येतील इंदिरा नगर झोपडपट्टीत राहणारा विजय हे काही दिवसांपूर्वीच सुट्टी पूर्ण करून कामावर रुजू झाले होते.

आई वडिलांना एकुलता एक असणारे विजय 2016 साली भारतीय सैनिकात दाखल झाले होते. अतिशय मनमिळाऊ स्वभाव असणाऱ्या विजय यांच्या मृत्यू झाल्याच्या बातमीने पवई सहित मौजे वासारवाडीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे.
ईयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण विजय यांनी पवईतील द्यानमंदिर विद्यालयात घेतले 2016 साली शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना विजय हे भारतीय सैन्यात दाखल झाले. 20 जुलै रोजी दैनंदिन प्रमाणे कामावर रुजू होण्यापूर्वी विजय यांनी आपल्या वडिलांशी संभाषण करून आई आणि वडिलांच्या तब्यातची विचारपूस केली.नंतर श्रीनगरच्या लष्कर कार्यालयात कर्तव्य बजावत असताना विजय अचानक खाली कोसळले आणि उपस्थित जवनांनी त्यांना तत्काळ लष्कर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदहायविकाराचा झटक्यानेच विजय यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती लष्करानी त्यांच्या कुटुंबाला दिली.

वीर जवान विजय कोकरे यांच पार्थिव शनिवार सकाळी 9 वाजता मुंबईत दाखल होणार असून पवईच्या चैतन्य नगर भाजी मंडई परिसरात त्यांच पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. विक्रोळीच्या टागोर नगर स्मशान भूमीत दुपारी 1 वाजता त्यांच्यावर लष्कर इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


