प्रतिनिधी
कलाकार हा आपल्या कलेच्या माध्यमातून जनतेसमोर आपल्यातील कलागुणांना सादर करत असतो.कधी चित्र काढत तर कधी साहित्याच्या माध्यमातून आपली कला सादर करत असतो.
त्याच प्रमाणे कोकणातील सिंधुदुर्ग येथील एका तरुणीने आपल्या कलेतून सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे.या कलेत खिळे आणि काळ्या रंगाचा धागा वापरत लाकडी फळीवर सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.हे प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांना ५-६ दिवसाचा कालावधी लागला.
पुजा हिने ही कला आपल्यात आत्मसात करीत वेगवेगळ्या प्रकारे महापुरुषांच्या विचारांना ती तिच्या कलेतून जनमानसात पोहोचवत आहे.याअगोदर देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देखील पुजा कदम यांनी खिळे आणि धाग्याच्या साहाय्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली होती.