काँग्रेसला राजकीय नितीमत्ता नाही!

News Dec 20, 2022

By Avinash Hazare

खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत काँग्रेसवर साधला निशाणा

प्रागतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने देशातील जनतेला खोट्या आश्वासन देत मुलभूत प्रश्नांना कायम बगल दिली असून, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने शिवसेनेबरोबर केलेला घरोबा हा काँग्रेसने राजकीय नितीमत्ता सोडल्याचा पुरावा आहे. हाच धागा पकडून खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला असून, त्यांच्या राजकीय चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
नुकतेच संसदेमध्ये रिप्रेजेंटेशन ऑफ़ पीपल विधेयकावर चर्चा झाली त्यात खासदार मनोज कोटक यांनी भाग घेत विधेयकाच्या अनुषंगाने अनेक मुद्दे त्यांनी यावेळी उपस्थित केले.
यावेळी काँग्रेस पक्षाच्या नीतिमत्तेवर भाष्य करताना ते म्हटले की, काँग्रेसचा निवडणुकीपूर्वीचा जनतेचा मुद्दा हा काँग्रेस सत्तेत आल्यावर प्रिंटिंग मिस्टेक होते.
काही पक्ष मोफत वीज आणि पाण्याबद्दल बोलतात, पण त्या पक्षाने निवडून आल्यानंतर ते आश्वासन पूर्ण केले नाही तर त्या पक्षाच्या मान्यतेवरही प्रश्नचिन्ह उभे करायचे का? असा प्रश्न उपस्थित करत विधेयकावरील चर्चेदरम्यान, सक्तीच्या मतदानाबाबत कोटक यांनी मत मांडले ज्यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा करणे आणि मतदारांना मतदानाचा कालावधी वाढविण्याबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.
विधेयकावरील चर्चेदरम्यान भारताची विश्वगुरु बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रयत्नांमुळे भारतातील नागरिकांना जगात कशी ओळख मिळत असून, जगातील बहुतांश इंजीनियर, डॉक्टर हे भारतीय वंशाचे आहेत, अनेक देशांमध्ये भारतीय वंशाचे लोक सरकारमध्ये आहेत. भारतीय नागरिक केवळ भारतातच नव्हे तर जगात प्रस्थापित पदांवर विराजमान झाले आहेत आणि आपण विश्वगुरूच्या पदावर प्रस्थापित झालो आहोत. असेही खासदार कोटक यांनी सांगितले.

Tags