आय आय टी मुंबईत विद्यार्थीची उडी मारून आत्महत्या

BREAKING NEWS Feb 12, 2023

By Raviraj Shinde

मुंबईःपवईतील आय आय टी मुंबईत एका तरूणाने हॉस्टेलच्या ७ व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे.

दर्शन सोलंकी(१९) असे या विद्यार्थीचे नाव असून मूळचा अहमदाबाद असणारा दर्शन तीन महिन्यापूर्वीच शिक्षणासाठी आय आय टी मुंबईत आला होता.  आय आय टीतील १६ नंबर हॉस्टेलच्या ८०२ रूम मध्ये दर्शन राहत होता.

दुपारी अचानक हॉस्टेलच्या परिसरात काही तरी पडल्याचा  आवाज आल्याने एकच धावपळ झाली होती तेथील कर्मचाऱ्यांनी बघितल्यावर दर्शन रक्त भंबाळ अवस्थेत होता त्याला तत्काळ  आय आय मुंबई रूग्णालयात नेण्यात आले परंतु काही तासानेच उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दर्शनचा मृतदेह राजावाडी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून  पवई पोलिस याघटनेचा अधिक तपास करत आहेत.

Tags