रविराज शिंदे
मुंबई- हवामानातील बदल आणि त्यामुळे होणारे संसर्गजन्य आजारापासून नागरिकांना रोगमुक्त करण्यासाठी भांडूप मधील डॉक्टर पूढे सरसावले असून या डॉक्टरांनी स्थापन केलेल्या भांडूप मेडीकोज कम्युनिटी वेलफेयर सोसायटीच्या माध्यमातून पवईतील महात्मा जोतिराव फुले नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर मंगळवारी भरविण्यात आले होते. या शिबीराला फुले नगर सहीत अन्य विभागातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता.

या शिबीरात हिमोग्लोबीन हाडांची सघनता ,ब्लड शूगर, कोलेस्टेरॉल, डोळ्यांची तपासणी व औषधोपचार करत एकून 107 रूग्णांची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी आरोग्याविषयी घेण्याची काळजी व रूग्णांसाठी विशेष मार्गदर्शन ही यावेळी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आले.

डॉ इंदवीर मिश्रा, डॉ अथाणी, डॉ सी वी पाटील, डॉ वैभव पोफळे, डॉ सदानंद जाधव, डॉ जयप्रकाश पोळ, डॉ प्रमोद शिंदे , डॉ मनोज प्रजापती, डॉ रवी पांडे, डॉ सचिन चांदवडकर, या डॉक्टरांच्या उपस्थितीत सदर शिबीर संपन्न झाले. शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ अमित त्रिपाटी ,डॉ ओमकारनाथ त्रिपाटी, संकट मोचन मंडळ आणि गणेश मित्र मंडळने अतुट परिश्रम घेतले.